दिल्लीतील एम्स इस्पितळात कोरोनामुळे निधन झालेले बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यावर गुरुवारी सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत.दिल्लीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील अशी माहिती मिळाली आहे.
बुधवारी रात्री त्यांचे निधन होताच केंद्रीय प्रहलाद जोशी यांच्यासह कर्नाटकातील मंत्री लोकप्रतिनिधीनी त्यांचे पार्थिव दिल्लीहून बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले होते.त्यांचे व्याही मंत्री जगदीश शेट्टर हे रात्रीच बंगळुरूहुन दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते त्यांनीही पार्थिव बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र कोविड नियमावली नुसार त्यांचे पार्थिव दिल्ली बाहेर नेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली नव्हती यासाठी अंतिम संस्कार दिल्लीतचं होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिल्ली येथील लिंगायत स्मशानभूमीत शासकीय इतमामा नुसार अंतिम संस्कार होणार आहेत.कर्नाटक भाजपचे अनेक नेते,जवळचे कुटुंबीय पहाटे पाच बंगळुरू हून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
अंगडी यांची पत्नी मंगला अंगडी,मुलगी श्रद्धा आणि मोठे जावई दिल्लीतच आहेत तर सदाशिव नगर येथे मोठी मुलगी डॉ स्फूर्ती होत्या त्या व त्यांचे भाऊ देखील विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत.दिल्ली द्वारका सेक्टर 4 मधील लिंगायत स्मशानभूमीत अंगडीवर अंतिम संस्कार होतील अशीही माहिती मिळाली आहे.
अंगडी बेळगाव लोकसभेत सतत चार वेळा अपराजित होते मात्र बुधवारी रात्री त्यांना कोरोनाने हरवले त्यांना श्रद्धांजली म्हणून बेळगावच्या जनतेने एक दिवस बेळगाव बंद ठेवावं अश्या शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
एक दिवस शासकीय दुखवटा-
अंगडी यांच्या निधनाने राज्यभरात शासकीय दुखवटा व्यक्त करण्यात येणार आहे.गुरुवार 24 रोजी राज्यात कोणतेही मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत राष्ट्रध्वज अर्धवट फडकवला जाणार आहे. मोहम्मद मोमीन राज्य सरकारच्या कार्यदर्शीनी हा आदेश बजावला आहे
Bhavpurn shradhjali pn te aparajit rahile nahit tr tyana belgavachya jantene aprajit tevale.