Thursday, December 19, 2024

/

मोबाईल न दिल्याने तरुणाची आत्महत्या

 belgaum

वारंवार मोबाईलवर गेम खेळत बसू नकोस असे कुटुंबीयांनी सांगितल्याने राग अनावर झालेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. रविवारी सकाळी केदनुर तालुका बेळगाव येथे ही घटना घडली आहे.

राजू सिद्धाप्पा अजणी असे त्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी दहा ते साडे दहा या वेळेत घरात कोणी नसताना राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू हा सेंट्रींग काम करत होता. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक आर टी लकनगौडर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई शेताकडे जात होती. त्यावेळी राजी हा मोबाईलवर गेम खेळत होता. गेम खेळू नकोस शेताकडे ये असे सांगून आई शेताकडे निघून गेली. या मनस्तापातून राजुने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.

उत्तरीय तपासणी करून मृतदेह शवागारात हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.