बेळगाव खडेबाजार जवळील कल्याण ज्वेलर्स मध्ये चोरी करणारी जोडगोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली आहे. ग्राहक असल्याचे भासवून त्यांनी कल्याण ज्वेलर्स मध्ये चोरी केली होती.
याचबरोबर बेंगलोर हुबळी धारवाड बेळगाव सह अनेक ठिकाणी या जोडगोळीने गुन्हे केले आहेत. विरक्तनंद उर्फ संतोष महादेवाप्पा कटगी वय 38 राहणार अशोक नगर हुबळी, शरत श्रीकांत कारंथ वय 37 राहणार गदक अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांना बेंगलोर येथे पकडले आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. यासंबंधी कल्याण ज्वेलर्स चे व्यवस्थापक सोनू पी एस यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कल्याण ज्वेलर्स मधून ग्राहक असल्याचे भासवून पाच तोळ्याची चेन लांबविण्यात आली होती.
हुबळी उपकारागृहातून पोलीस कोठडीत घेऊन खडेबाजार पोलिसांनी या जोडगोळीची कसून चौकशी सुरू केले आहे. शोरूम मध्ये जाऊन या भामट्यांनी कर्मचाऱ्याला चेन दाखवण्यास सांगितली. कर्मचाऱ्याने सोन्याची चेन असलेले ट्रे त्यांच्यासमोर ठेवला असता त्यामधील पाच ग्रॅम वजनाची एक चैन घेऊन कर्मचाऱ्यांची नजर चुकवून भामट्यांनी त्याजागी डुप्लिकेट चेन ठेवली होती. या प्रकरणात खडेबाजार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याचबरोबर त्यांनी हुबळी धारवाड येथे हे मोबाईल चोरल्याची ही उघडकीस आले आहे.
या दोघा जणांनी मोबाईल शोरूम मधून 15 मोबाईल पळवण्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. कल्याण ज्वेलर्स मध्ये चोरी करणारे दोघेजण अटक झाल्यानंतर काही ना दिलासा मिळाला आहे.