बेळगावच्या गुलमोहर या आर्टिस्ट ग्रुपने “कोरोनानंतरचे जग आणि जीवन कसे असेल?” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांना संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत “अ” गटात पार्थ कालेकर (पुणे), रितुपर्णा मोहंती (भुवनेश्वर), व अनय रस्तोगी (मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले आहेत. तर पूर्वा बंगार (पुणे), पर्णिका दिवाने (पुणे), व अंतरा मर्डी (बेळगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
त्याचप्रमाणे “ब” गटात ट्विंकल अगरवाल (चंदिगढ), श्रुती दत्ता (कोलकत्ता), अभिनव शेट्टी (बेळगाव) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक तर आदित्य बामिष्टे (पुणे), शुभम द्विवेदी(पुणे), मॉर्फस नाग (चंदिगढ) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले आहेत.
“अ” गटातील मुस्कान नहाटा (बंगळूर), हनिया (धारवाड), सहाना पै (बंगळूर), चार्मी जैन (मुंबई), तर “ब” गटात चार्वी बी. (बंगळूर), आसावरी भोसेकर (नांदेड), पूर्बीता पट्टनायक (रोरकेला), अभिक्षिता पॉल (हॉवर्ड) हे जजीस अवार्ड सर्टिफिकेटचे मानकरी ठरले आहेत.
या ऑनलाईन स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार शरद तरडे, सूचित तरडे यांनी काम पहिले. या स्पर्धेसाठी एकूण ९०० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. त्यातून दुसरया फेरीसाठी १०० चित्रांची निवड करण्यात आली होती. आणि अंतिम टप्प्यात २० चित्रांची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली.