Friday, December 20, 2024

/

बेळगावच्या अपराजित खासदारांची एक्झिट..

 belgaum

बेळगाव तालुक्यातील केके कोप्प जवळील नागेरहाळ सारख्या ग्रामीण भागातून आलेले, उच्चविद्याविभूषित एल एल बी शिक्षण झालेले सुरेश चन्नबसप्पा अंगडी यांचे निधन हे बेळगावच्या राजकीय पटलावर धक्कादायक पेक्षा हादरा देणारी घटना ठरली आहे.

सुरेश अंगडी हे सर्वपक्षीय मान्य व्यक्तिमत्व होते. सगळ्याच पक्षात अंगडी यांचा मित्र परिवार होता. अंगडी यांनी आपल्या खासदारकी आणि मंत्री पदाच्या कारकिर्दीत कधीही लहान थोर असा भेदभाव केला नाही.

सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा नेता अशी राजकारणात अभावाने आढळणारी ओळख त्यांची होती.व्यवसाया निमित्त 1990 च्या दशकात ते बेळगावात आले. वासवदत्ता सिमेंटची त्यांनी एजन्सी घेतली त्यांच्या लाघवी स्वभावामुळे व्यवसाया बरोबरच त्यांचा जनसंपर्क वाढला. त्यांच्यातले संघटक गुण हेरून भाजपने त्यांना 2001 साली भाजप महानगरअध्यक्ष पद दिले. त्यांच्या कारकिर्दीत बेळगाव जिल्ह्यात भाजपने पाय रोवले.Angdi

2004 सालीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि बेळगावचे खासदार झाले.त्या नंतर पुढील सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकून बेळगाव वरील आपली पकड सिद्ध केली.अंगडी यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वामुळे त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पद मोदी यांनी बहाल केले.30 मे 2019 रोजी त्यांनी रेल्वे राज्य मंत्री म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती.

रेल्वे राज्य मंत्री झाल्या नंतर अंगडी यांच्या कारकिर्दीला अधिकच झळाळी प्राप्त झाली बेळगावच्या बाबतीत अनेक नवीन निर्णय झाले.खासदार मंत्री याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील अंगडी यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्याअंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सामान्य माणसाशी थेट संपर्क असलेला बेळगावचा नेता गेल्याने बेळगाव भाजपची अपरिमित हानी झाली आहे.एखादी जवळची व्यक्ती गमावल्याची भावना भाजप कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.

अंगडी यांच्या बेळगाव सदाशिवनगर येथील निवासस्थाना समोर निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.दिल्लीत एम्स मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची एक मुलगी व्यतिरिक्त सर्व कुटुंबीय दिल्लीत आहेत.

मयत रेल्वे राज्यमंत्री कोरोना पोजिटिव्ह असल्याने नियमानुसार त्यांच्यावर दिल्लीत अंतिम संस्कार होणार आहेत मात्र स्थानिक भाजप नेते आमदार खासदार त्यांचे पार्थिव बेळगावला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.