शहर आणि परिसरात गांजा विक्री करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पोलिसांनी मुसक्या आवळण्यात सुरुवात केली आहे. शिंदोळी क्रॉस जवळ गांजा विकणाऱ्या चौघा जणांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
सीसीआयबीच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून एक किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सिद्धाप्पा बसवंत कुरबर वय 35, सोमनाथ शिवाप्पा मादनशेट्टी वय 34 दोघेही राहणार हनीकेरी, सागर सदाशिव नाईक व 21 राहणार सांबरा विनायक बसाप्पा सोमनावर वय 20 राहणार पंत बाळेकुंद्री अशी अटक करण्यात आलेल्या चौकटींची नावे आहेत. पोलीस आयुक्त डॉक्टर के. त्यागराजन, उपायुक्त सीमा लाटकर, चंद्रशेखर निलगार व गुन्हे तपास विभागाचे एसीपी महानतेश्वर जिद्दी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती उघडकीस येत आहे. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी छापे टाकून कारवाया करण्यात आले आहेत. त्यामुळे गांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे. शिंडोळी क्रॉस येथील रस्त्यावर गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून चौकडीला अटक करण्यात आली.
या सर्व 14 जणांवर पोलीस स्थानकात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता जूनही पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे गांजा विक्री करणार्यांचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.