वनविभागातर्फे ११ सप्टेंबर राष्ट्रीय अरण्य हुतात्मा दिन म्हणून आचरणात येतो. वनसंपत्तीच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या वनसंरक्षकांचे स्मरण करून त्यांना विभागाच्या वतीने अभिवादन केले जाते. बेळगावमध्येही राष्ट्रीय अरण्य हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला.
मानवजातीच्या विकासासाठी वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अमूल्य वृक्ष संपत्तीचे रक्षण करणे, वन्य प्राण्याची शिकार आणि तस्करीवर आळा घालणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. बऱ्याच घटनांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ह्या वनसंरक्षकांनी आपले प्राण गमावले आहेत.
या हुतात्मा झालेल्या वन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ११ सप्टेंबरला राष्ट्रीय वन हुतात्मा दिन साजरा केला जातो. बेळगावच्या वनविभागाच्या कार्यालय शुक्रवारी राष्ट्रीय वन शाहिद दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हवेत फैरी झाडून, हुतात्मा वन रक्षकांना मानवंदना दिली.
जिल्हा वन अधिकारी एम व्ही अमरनाथ यांनी ११ सप्टेंबर १७३० रोजी जोधपूरचे महाराजा अभयसिंग यांच्या सैनिकांनी, बिष्णोई समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलांना मारहाण केली. केजरीली प्रान्तात वाढलेली झाडे तोडण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. वृक्षांच्या संरक्षणासाठी आपली प्राणांचे आहुती देणाऱ्या बिष्णोई लोकांच्या बलिदानाची आठवण म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून घोषित केला आहे.
यावेळी वनविभागाचे अधिकारी बसवराज पाटील म्हणाले कि, कर्तव्य पार पडत असताना कितीही अडचणी आल्या तरी आपले प्राण धोक्यात घालून वन संपत्तीचे रक्षण करीत असतात. अशा परिस्थितीत आपले प्राण गमावलेल्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. हुतात्मा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत असा त्यांनी धीर दिला. या कार्यक्रमाला एसएफओ एस के कल्लोळीकर, एसीएफ अशोक मदार, आरएफओ आर एच डोंबरगी, डी वय एस एफ जे आर नायक, अधिकारी विनय गौडर , एम ए किल्लेदार , शिवानंद मंजरगी आणि इतर उपस्थित होते.