पतंग उडविताना वापरण्यात येणार धोकादायक मांजा अनेक ठिकाणी तयार करण्यात येतो. आणि अनेक दुकानांमधून त्याची विक्रीही केली जाते. या धोकादायक मांजामुळे गांधीनगर ब्रिज जवळ राहुल राजगोळकर हा दुचाकीस्वार जखमी झाला. सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. परंतु जखमी युवकाची परिस्थिती पाहून हा धोकादायक मांजा बनविणाऱ्यांवर तसेच विक्री करण्यावर बंदी घालण्यात यावी यासाठी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याला अनुसरून मांजा बनविणे आणि विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली असून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बेळगावमध्ये लहान मुले आणि तरुणांमध्ये पतंग उडविण्याचे क्रेझ सुरु आहे. हा पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर केला जातो. परंतु हा मांजा धोकादायक ठरत असून अनेकजण यामुळे जखमी झाले आहेत आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नुकतेच कपिलेश्वर उड्डाण पुलावर संभाजी नगर, वडगांव येथील वसंत खनुकर नामक दुचाकीस्वार जखमी झाला होता. मागील वर्षीही मांजामुळे बेळगावात अनेक जण जखमी झाले होते.
मुलांच्या शाळा अजूनही सुरु झाल्या नसून सध्या सर्व मुळे घरीच आहेत. पतंग उडविण्यासाठी अनेक लहान मुले आणि तरुण खुल्या जागेत, गच्चीवर, मैदानावर पतंग उडवताना दिसून येत आहेत. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाला धार असल्यामुळे अनेकजण यामुळे जखमी होतात. शिवाय मागील वर्षी पक्षीही या मांजर अडकल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंजुर बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली होती.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी मांजा बनविणे, त्याची विक्री करणे तसेच त्याची खरेदी करणे यावर बंदी घातली असून दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. पालकांनी याबाबत विचार करावा, आणि युवकांनीही काळजी घ्यावी, शिवाय लहान मुलांना मांजा देऊ नये, त्याबद्दलचे धोके आपल्या पाल्याना समजावून सांगावेत, अशी विनंतीही पोलीस आयुक्तांनी केली आहे.