बेहिशेबी मालमत्ता आणि करोडोंच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या “ईडी” या केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेने महसूल विभागांतर्गत संगोळी रायन्ना सहकारी संस्थेत झालेल्या घोटाळ्याबाबत कारवाईचे नवे पाऊल टाकले आहे.
प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट २००२ च्या अंतर्गत मालमत्ता आणि बँक खात्यातील शिल्लक रक्कम ईडीने संलग्न केली आहे.
सुमारे ३१.३५ कोटी रुपयांची मालमत्ता आणि बँक खात्यातील रक्कम हि महसूल विभागाच्या अखत्यारीत आणण्यात आली आहे.
क्रांतिवीर संगोळी रायण्णा संस्थेचे चेअरमन आनंद अप्पुगोळ, आणि इतरांवर संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कारवाईबाबत ईडीने ट्विट करून माहिती दिली आहे.