बेळगाव शहर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपयुक्त डीसीपी विक्रम आमटे यांनी आज बेळगाव भेटीवर आलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेतली.
शिवप्रतिष्ठान बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या टिळकवाडी येथील निवासस्थानी आज संभाजी भिडे गुरुजी दाखल झाले होते. त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी विक्रम आमटे यांच्यासह विश्वनाथ पाटील, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर बडीगेर उपस्थित होते.
यावेळी विक्रम आमटे यांनी भिडे गुरुजींशी संवाद साधला.
यावेळी कोरोनासंदर्भात बोलताना भिडे गुरुजी म्हणाले की, कोरोनाला हरविण्यासाठी चीनला घाबरण्याची गरज नाही. कोरोनासारख्या संकटाला हरवायचे असल्यास तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक असल्याचे भिडे गुरुजींनी सांगितले. कोरोनाव्यतिरिक्त इतर विषयांवरही अनेक वेळ विक्रम आमटे आणि भिडे गुरुजींच्या गप्पा रंगल्या होत्या.
याशिवाय सामान्य नागरिकांसह आरोग्य अधिकारी यांच्यापासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी व्यायाम करणे गरजेचे आहे, असा कानमंत्रही गुरुजींनी दिला आहे. घरात बसून खाऊन लठ्ठ होण्यापेक्षा सशक्त होण्यासाठी अनेक सूचना भिडे गुरुजींनी दिल्या.
कोरोनाला हरवण्यासाठी चीनचा विषय संपवायला हवा त्यासाठी व्यायाय गरजेचे आहे असेही भिडे म्हणाले