पतंगाच्या मांजात अडकून पडलेल्या कावळ्याला आज “बावा” म्हणजेच बेलगाम ऍनिमल वेलफेअर असोसिएशन या संस्थेने जीवदान दिले आहे. काकतीवेस रोड येथे झाडावर हा कावळा पतंगाच्या मांजात अडकलेला आढळून आला.
पण या झाडावर चढण्यासाठी आखूड जागा असल्याकारणाने येथे चढणे थोडे अवघड होते. त्याशिवाय या झाडाजवळूनच उच्च दाबाची विजेची तारही गेली होती.
लागलीच येथील स्थानिकांनी पक्षी-प्राणीप्रेमी मंडळ “बावा” या संस्थेला कळविले. आणि त्यानंतर झाडावर चढणाऱ्या सऱ्हाईताने या कावळ्याची अलगद सुटका केली.
त्यामुळे येथील उपस्थितांनी या टीमचे कौतुक केले. शिवाय या कावळ्याला पितृपक्ष पंधरवड्यात जीवदान मिळाले हे नवल!
बेळगावातील बावा ही प्राणी दया संघटना अनेक कुत्र्यांना जीवनदान देत असते भुकेल्या मुक्या प्राण्यांना पोटाला खायला घालत असते आणि कावळ्या सारख्या पक्षाला देखील जीवनदान दिले आहे बावा bawa या संघटनेचे करावे तितके कौतुक कमीचं….