कोरोनाची टिमकी अजूनही थांबता थांबत नाही. परंतु शहर आणि परिसरात या रोगापेक्षाही जास्त अस्वच्छ्तेची धास्ती वाटू लागली आहे.
अपवाद वगळता शहराच्या कानाकोपऱ्यात, झाडाझडुपांत कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासन स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आग्रही आहे. परंतु शहरासह उपनगरात कचऱ्याची समस्या “जैसे थे” अशीच आहे. हिंदवाडी येथील महालक्ष्मी मार्ग परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आले.
अर्ध्या अधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. या परिसरात कचरा उचल करणारी गाडी
दररोज यायची. परंतु जसा लॉकडाऊनचा काळ संपला तशी हि कचरा उचल करणारी गाडी येणे बंद झाले आहे. आठवड्यातून केवळ एकाच दिवशी ही गाडी या परिसरात येते. शिवाय याठिकाणी कचरा कुंडाचीही व्यवस्था नाही.
कचऱ्याची उचल योग्य वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांकडून इतरत्र कचरा फेकण्याचे काम सुरु आहे. यामुळे महालक्ष्मी मार्ग परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून कुत्र्यांमार्फत कचरा इतरत्र पसरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वचतेचा डंका पिटण्यात येत आहे.
परंतु याबाबत प्रशासनासह नागरिकांनाही जण नसल्याचे जाणवत आहे. प्रशासनासह नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. आणि प्रशासन या समस्येकडे त्वरित लक्ष पुरवून उपाययोजना राबवावी, अशी मागणी काही सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.