बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये तर शुक्रवारी एका दिवसांत 1 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मास्क सॅनीटायझर आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे असताना शहरातील बाजारात अनेकजण मास्क न परिधान करता फिरत आहेत दुचाकीवरून मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळं मनपाने दंड वसूल मोहीम हाती घेतली आहे.
दोन दिवस झाले आम्ही ही मोहीम काटेकोरपणे राबवत असून मास्क न परिधान करणाऱ्याकडून 100 दंड वसूल करत आहोत आरोग्य आणि महसूल खात्याचे अधिकारी या मोहिमेत सहभागी आहेत.
![Mask ccb](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/09/FB_IMG_1601050279931-660x330-1.jpg)
दुचाकीस्वार असो किंवा पादचारी शहरात फिरताना मास्क न परिधान करता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे म्हणून धडक कारवाई करत आहोत अशी माहिती मनपा आयुक्त जगदीश यांनी दिली.
लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यावी,मास्क परिधान करावं म्हणून दंड वसुल मोहीम हाती घेतल्याचे देखील जगदीश यांनी स्पष्ट केले