राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील सर्व्हिस रोड शेजारील होलसेल फ्रुट मार्केट लगत गांजा आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
मल्लप्पा सिद्राम निप्पाणी (वय : ४५, रा. नागरमुन्नोळी, मुगळखोड, ता. रायबाग) तसेच या व्यक्तीच्या सांगण्यावरून अमली पदार्थ पुरविणाऱ्या मोनाप्पा मल्लप्पा वाड (वय : ३५), विशवराज हणमंत बैनार (वय २६) (दोघेही राहणार आलूर (के.) जि. कलबुर्गी ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या आरोपींकडून एकूण २,५०,००० रुपये किमतीचा १५ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे २ लाख किमतीची टाटा इंडिका कार, ३ मोबाईल संच तसेच ४,६०० रुपये रोख पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांच्या विरोधात बेळगाव शहर सीईएन पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले असून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पीआय संजीव कांबळे, एसीपी एन. वि. बरमणी, यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.