कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे जोखीमेचे आहे आदेश शिक्षण खात्याने रद्द करावा अशी मागणी जिल्हा शिक्षण अधिकारी ए बी पुंडलिक यांच्याकडे शिक्षक संघटनेने निवेदन दिले.
दहावीच्या पुरवणी परीक्षेचे मूल्यमापन करण्यासाठी बेळगाव जिल्हातील मराठी माध्यम शिक्षकांना बिदर येथे हजर रहण्याचा आदेश परीक्षा मंडळानं बजावला आहे.बेळगावातील शिक्षकांनी ४५० कि मी प्रवास करणे जीवाला धोकादायक आहे. शिवाय तिथं राहूनही तिथल्या वातावरणाचा आणि रोगाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
कोरोनाच्या संसर्गानं जगाचा जीव गुदमरतो आहे त्यातही जीवावर उदार होऊन पोलिस, अशा कार्यकर्त्या त्याच बरोबर तपासणी नाक्यावरही कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना त्याच बरोबर विविध प्रशिक्षणातून, विद्यागम राबवून स्वतःचा विचार न करता आजार ओढवून घेऊन बऱ्याचं शिक्षकांनी जीव गमावला आहे.
जर शिक्षक संघाची मागणी मान्य झाली नसल्यास परिक्षा मूल्यमापनावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला. शिक्षक हा समाजप्रिय आहे सरकारी प्रत्येक कामात अग्रेसर विविध योजना राबविण्यासाठी शिक्षकाला जुंपले जाते. सरकारी कार्यालयात खोगीर भरती असते.
दिवसभर फुकटं वेळ घालविण्यात कर्मचारी गुंतलेले असतात पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात मात्र शिक्षकाला वेठीस धरलं जातं आणि कारवाईचा बडग्याची टांगती तलवार शिक्षकावर रोखली जाते . यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील शिक्षणाधिकारी आप्पान्ना पॅटी माजी जिल्हाध्यक्ष राजाराम कुरतुरकर, खजिनदार सुरेश कळ्ळेकर, विश्वास गावडे,के.एन. पाटील, सुदिप चौगुले, सुचिता पाटील, नंदा शिंदेसह शिक्षक -शिक्षिका उपस्थित होत्या