बेळगाव हे अमली पदार्थांचे केंद्र बनत आहे. तीन राज्यांच्या मध्यवर्ती सीमेवर असलेले बेळगाव आता अमली पदार्थांच्या विक्री साठीही चर्चेत येऊ लागले आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून गांजा विक्री प्रकरणातील अनेक आरोपींना पकडण्यात आले आहे. ही कारवाई गतिमान करण्यात येत असतानाच आता बेळगावातील गांजा कनेक्शन उघड होत आहे.
तीन राज्यातून बेळगाव शहर आणि परिसरात गांजा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे बेळगावचे गांजा कनेक्शन लवकरच उघड होणार यात शंका नाही. बेळगाव पोलिसांनी अमली पदार्थ विकणाऱ्यांना आळा घातला आहे. आसाम तेलंगणा आंध्रा मधून बेळगावला गांजा पुरवठा होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात येत आहे. डीसीआयबीच्या मिरज येथील अश्पाक मैनुद्दीन मुल्ला वय 43 याला अटक करून म्हैशाळ जवळ त्याच्याकडून सव्वा क्विंटल गांजा जप्त केला होता. त्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतर हैदराबाद मधून हा साठा मागविण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली आणि त्यामुळेच बेळगाव येथील गांजा कनेक्शन उघडकीस आले.
बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून कारवाया सुरू करण्यात आले आहेत तर बेळगावात नेमका कुठून गांजा येतो याचा तपास लावण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगाव येथे आसाम तेलंगणा आंध्रा मधून हा गांजा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता बेळगाव मधील पोलीस सज्ज झाले असून अनेकांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.