पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका शिपायाने सरकारी वस्तीगृहात गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.
अशोक सिद्धलिंगाप्पा मूकन्नावर वय 48 असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. अशोक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मृत्युपत्र लिहून ठेवले आहे. माझ्या मूर्तीला कोणीही जबाबदार नाही असे त्या मूर्ती पत्रात उल्लेख आहे. त्यामुळे पोलिसांनी ते मृत्युपत्र पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून आपण आपले जीवन संपवत आहोत असे त्या मृत्युपत्रात म्हटले आहे.
घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद महापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. अशोक यांची पत्नी गावी गेली होती. सकाळी त्यांनी फोन केला असता अशोक यांनी फोन उचलला नाही म्हणून आपल्या भावाला सांगून काय झाले आहे ते पाहण्यास सांगितले होते.
तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून संबंधित अशोकने आपले जीवन संपविले आल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.