आपण पण एसीबीचे अधिकारी असून तुमच्या विरोधात एक तक्रार आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पाच लाख रुपये द्या अन्यथा तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्या एसीबी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून अनेक भामटे पोलिस अधिकाऱ्यांचे नाव बदनाम करण्याचे दिसून येत आहे.
बेळगाव एसीबी अधिकारी असल्याचे सांगत सरकारी अधिकारीयांकडे पैशाची मागणी करणाऱ्या दोघा तोतया अधिकाऱ्यांना बैलहोंगल पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्याला धमकावून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सोमवारी सायंकाळी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. विशाल भाक्याप्पा पाटील ( वय 42 , मुळचा रा. देशनूर, सध्या रा. वन्नूर, ता. बैलहोंगल), श्रीनिवास अश्वथनारायण ( वय 38, रा. कोडगेनहळ्ळी, सहकारनगर, बेंगळूर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्या जवळून मोबाईल संच, एक कार जप्त करण्यात आला आहे.
वैद्यकीय तपासणी करुन या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर रोजी बैलहोंगल येथील सहाय्यक कृषी अधिकारी बी. आर. हुलगण्णावर यांनी बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. कुणी तरी एक व्यक्ती आपण एसीबी अधिकारी असल्याचं सांगत तमच्या विरुध्द केस आली आहे.
जर ही केस रजिस्टर झाली तर तुमचे नाव खराब होईल त्यामुळे पाच लाख रुपये द्या आणि ही केस इथेच संपवा असे सांगून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या भामट्यांना पकडून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनेक तोतया अधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.