Wednesday, November 20, 2024

/

जनतेला आरोग्य सुविधा पुरवा-

 belgaum

दररोज कोरोनारुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि इतर सर्वसामान्य आजारांवर उपचार न मिळण्याच्या कारणास्तव अनगोळ भागात जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. परंतु व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.

अनगोळ भागात विविध आजार बळावले आहेत. याठिकाणी अनेक झोपडपट्ट्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारखे सामान्य आजार वाढत आहेत. अजूनही काही डॉक्टर्स उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनगोळ भागात वैद्यकीय असुविधा असल्यामुळे दररोज ८ ते १० लोकांचा मृत्यू होत आहे.

अनगोळ भागातील डॉक्टरांकडून सर्वप्रथम कोविडची चाचणी करून घेण्यास सांगितले जात आहे. त्याअनुषंगाने सिव्हिल हॉस्पिटल किंवा केएलई मध्ये दाखल होण्यास सांगितले जात आहे. अनेक नागरिक कोविडच्या भीतीमुळे जीव गमावत आहेत.

अनगोळ भागात अर्बन हेल्थ सेंटर कार्यरत आहे. याठिकाणी १० बेड्सची सुविधा आहे. त्याचप्रमाणे कोरोना चाचणीसाठी लॅबचीही सुविधा आहे. याठिकाणी केवळ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. यामुळे या हेल्थ सेंटरमध्ये इतर रुग्णांचीही चाचणी करण्यात यावी, तातडीची सेवा पुरविण्यासाठी तसेच गरोदर महिलांवरही तातडीच्या काळात उपचार करण्यात यावेत, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा. आणि यासंदर्भात सूचना येथील डॉक्टर्स आणि परिचारिकांना देण्यात याव्या, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. आवश्यक वेळी आपण ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली असून इतर सुविधांसाठी हेल्थ केअर सेंटर कडून सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात मनपा आयुक्त, वॉर्ड क्रमांक ते ८ मधील कार्यरत असणारे सॅनिटरी इन्स्पेक्टर याना सूचना देऊन या विभागातील स्वच्छता करण्याबाबत पाऊले उचलण्यात यावीत, जेणेकरून कोविड व्यतिरिक्त येणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारांचा संसर्ग होणार नाही. त्याचप्रमाणे कोविड संदर्भातील नियम आणि अटी न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पोलीस विभागाकडे करण्यात आली आहे.

हे निवेदन सादर करताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, अरुण गावडे, मनोहर शिरोडकर, माजी नगरसेवक अनिल मुचंडीकर, मोहन भांदुर्गे, प्रशांत जाधव, मुरली पाटील, अमोल देसाई, जितेंद्र देवण, मोतेश बार्देशकर, एस. एल. बिर्जे, विनायक धाकलुचे, राजू पवार, लक्ष्मण देमजी, सदानंद हेब्बाळकर, मारुती पाटील आदींसह या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.