आज बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून आज नव्याने ३१८ रुग्ण आढळले आहेत. तर ३८८ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. यासह आज जिल्हयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६३६९ इतकी झाली आहे.
तर आजपर्यंत १३०७१ जणांना कोरोनापासून मुक्ती मिळाली आहे. अजूनही जिल्ह्यात ३०६१ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत एकूण २३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याशिवाय आज राज्यात ९८९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १०४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज उपचाराअंती ८४०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंतची राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४५९४४५ इतकी झाली आहे.
तर आजपर्यंत ३५२९५८ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत ७२६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अजूनही ९९२०३ रुग्णांवर उपचार सुरु असून ८०७ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
ऍक्टिव्ह रुग्ण –3061
एकूण पोजिटिव्ह –16369
एकूण कोरोनामुक्त – 13073 ( 388 आजचे)
आजचे मयत –0
एकूण मयत – 237
एकूण अहवाल प्रतीक्षेत-
असे आहेत डिस्चार्ज झालेले आकडे
Sep 12 – 631
Sep 5 – 331
Aug 30 – 715
Aug 29 – 536
Aug 28 – 789
एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण सापडलेले दिवस असे
575 on 11/08/2020
478 on 16/08/2020
473 on 05/08/2020
470 on 02/09/2020