Thursday, December 19, 2024

/

झायड्स कॅडीला” लसीच्या मानवी चांचणीला झाला बेळगांवात प्रारंभ

 belgaum

कोरोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी देशभरात प्रयत्न सुरू असताना बेळगावचा जीवन रेखा हॉस्पिटल त्यामध्ये सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सदर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन बरोबरच झायड्स कॅडीला कंपनीच्या कोरोना लसीच्या मानवी चांचणीला प्रारंभ झाला आहे.

दरम्यान, भारत बायोटेकबरोबरच अहमदाबाद येथील झायड्स कॅडीला हेल्थ केअर या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या मानवी चांचणीला आयसीएमआरकडून मान्यता देण्यात आली आहे. जीवन रेखा हॉस्पिटलमध्ये झायड्स लस एकूण 20 जणांना टोचण्यात आली आहे. मानवी लस टोचण्याचा हा जो प्रयोग केला जात आहे त्याचे निकष सर्वसाधारण कोव्हॅक्सीन प्रमाणेच आहे.

मात्र 18 ते 55 या वयोगटातील सुदृढ, निरोगी व्यक्तींना ही लस दिले जाते. झायड्स लस अंतर्गत हा वयोगट 12 ते 65 असा आहे. यासाठी लस टोचून घेणाऱ्या व्यक्तींची रक्त चांचणी आणि कोविड चांचणी करणे क्रमप्राप्त असते. कोव्हॅक्सीनसाठी आलेल्या स्वयंसेवकांचे स्वॅब आणि रक्ताचे नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र झायड्ससाठी आलेल्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने स्थानिक पातळीवर दिशा डायग्नोस्टिक येथे तपासले गेले. परिणामी जीवन रेखा हॉस्पिटलमधील मानव चांचणीची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

गेल्या 31 जुलै रोजी चार स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. या सर्व स्वयंसेवकांनी वैद्यकीय प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला असून अद्याप त्यांना कोणतीही रिअक्शन झालेले नाही. 14 दिवसांनंतर त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये मानवी लस टोचणारे डाॅ. अमित भाते यांनी दिली.

दरम्यान, संबंधीत दोन्ही लस टोचून घेण्यासाठी अद्याप स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात 375 जणांना ही लस देण्यात येणार आहे. स्वयंसेवक जितक्या स्वयंस्फूर्तीने पुढे येतील तितक्या लवकर चांचणीचे परिणाम समोर येतील असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.