मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना लवकरच मनिपाल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी याचे संकेत दिले. “तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघांची काळजी घेत आहे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना लवकरच सोडण्यात येईल.” असे सांगितले आहे.
दरम्यान, रुग्णालयाचे संचालक डॉ. मनीष राय यांनी हॉस्पिटलचे हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. 2 ऑगस्ट रोजी मणिपाल रूग्णालयात दाखल झालेल्या कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री श्री.बी.एस. येडियुरप्पा यांची प्रकृती “वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आणि उपचारांना प्रतिसाद चांगला आहे. क्लिनिकल तज्ञांची टीम त्याच्यावर बारीक नजर ठेवून आहे. “