Friday, April 26, 2024

/

हिरण्यकेशी आणि बळ्ळारी नाल्यामुळे घटप्रभेला दुथडी!

 belgaum

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी -नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे घटप्रभा नदीमध्ये आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 39,536 क्युसेस इतके मोठ्या प्रमाणातपाणी वाहत होते.

गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी आणि मार्कंडेय या नद्यांसमवेत बळ्ळारी नाला देखील तुडुंब भरून वाहू लागला आहे. परिणामी घटप्रभा नदीपात्राची पातळी वाढली आहे. हिरण्यकेशी नदीतून 20,135 क्युसेस, मार्कंडेय नदीतून 9,050 क्युसेस आणि बळळारी नाल्यातून 10,348 क्‍यूसेस इतके पाणी गुरुवारी सायंकाळी घटप्रभा नदीला मिळाल्यामुळे ही नदी तुडूंब भरून वहात होती.

दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजता राजापूर धरणातून कृष्णा नदीमध्ये 1,10,000 क्युसेस आणि दुध गंगा नदीत 30,272 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात झाला. याव्यतिरिक्त कल्लोळी धरणातून 1,40,272 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.

 belgaum

एकंदर गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व जलाशयातील पाण्याची पातळी वाढली असली तरीही अद्याप कोणत्याही जलाशयाने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.

View this post on Instagram

नदी काठाच्या गावांची केली पाहणी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेत जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ महिला बाळ कल्याण मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोलले आणि पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी आदींनी निपाणी चिकोडी तालुक्यातील नदीकाठावरच्या गावांना गुरुवारी भेट देऊन पाहणी केली. मागील वर्षी सारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तहसीलदार अन्य अधिकाऱ्यांनी आता पासूनच दक्ष राहावे अश्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या . येडूर या ठिकाणी एन डी आर एफ दलाशी चर्चा करून सतर्क राहण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

A post shared by Belgaum live (@belgaumliveofficial) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.