कोरोनाचा आणि पावसाचा हाहाकार सुरू असून उपचारा अभावी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागतोय. दवाखान्यात आजारी माणसाला कोरोनाच्या धास्तीमुळे दाखल करून घेतले जात नाही.अशी परिस्थिती असताना आजारी,जखमी मुक्या जनावरांचे हाल तर विचारायला नको.
खानापूरमधील नवीन बस स्थानका समोरील रस्त्यावर पायाला दुखापत झालेला एक घोडा वेदना सहन करत फिरत आहे.एक महिन्यापासून हे मुके जनावर एका पायाला दुखापत झाल्यामुळे तीन पायावर अवघडून चालत आहे.
या रस्त्यावरून वाहनाची वर्दळ खूप असते.त्यामुळे एखादया वाहनाचा धक्का देखील लागण्याची शक्यता आहे.वेदना सहन करून दिवस काढणाऱ्या घोड्याला दुखापत झाली तर या घोड्याचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे.
पशु रुग्णालय देखील जवळच आहे.पण एक महिना झाला तरी मुक्या जनावरावर पशु वैद्यकीय अधिकारी किंवा एखाद्या सहृदय व्यक्तीने उपचार करण्याचे औदार्य दाखवले नाही.या पायाला दुखापत झालेल्या घोड्यावर त्वरित उपचार करून त्याला बरे करण्याची गरज आहे.