महाराष्ट्रातून कोयना आणि वारणा नदीतून उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीत होणार पाणी विसर्ग यामुळे बेळगाव जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना रविवारी हाय अलर्ट देण्यात आला आहेच मात्र यावर खबरदारी म्हणून बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
रविवारी महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावक्र यांनी कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी त्यांच्या रविवारी चर्चा केली होती व अलमट्टी जलाशयातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती त्यानुसार सोमवारी अलमट्टी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे दोन लाख २० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.
बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाची पाणी पातळी ५१८.८० मी असून पाणी साठा १०९ टी एम सी आहे १ लाख २७ हजार क्युसेक्स आवक असून जावक अडीच लाख पाणी इतकी आहे. सोमवारी २५ हजार क्युसेक्स ने पाणी विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे प्रति सेकंद अडीच लाख क्युसेक्स पाणी विसरग होत आहे.
कृष्णा नदीतून अलमट्टी जलाशयांत जाणारे पाणी देखील वाढले आहे त्यामुळे आलमट्टीतून पाणी धोका टाळण्यासाठी अधिक पाणी सोडले जात आहे . सोमवारी सकाळी अलमट्टीत १ लाख २३ हजार क्युसेक्स इनफ्लो सुरु होता . अलमट्टी धरणाची क्षमता १२३ टी एम सी पाणी इतकी असून काल ११३ टी एम सी होता आज विसर्ग झाल्याने तो ११० टी एम सी इतका झाला आहे.
मागील कहाणी दिवसा पूर्वी जल्संपदा मंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्यात समन्वय बैठक झाली होती त्यानूसार दोन्ही राज्यात मागील वर्षी प्रमाणे पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून समन्वय राखण्याचा निर्णय झाला होता त्या पद्धतीने दोन्ही राज्यातील अधिकारी आणि मंत्री सतत संपर्कात आहेत.