अलीकडे युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शहरी शेतकरी अडचणीत आले होते. या संदर्भात बेळगाव शहर रयत संघटनेने ठेवलेल्या आवाजाची दखल घेऊन कृषी खात्यातर्फे आज रविवारपासून युरिया खत पुरवठ्याला प्रारंभ करण्यात आला आहे.
अलीकडे युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शहरी भागातील शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. यासंदर्भात बेळगाव शहर रयत संघटनेने आवाज उठवून जिल्हाधिकारी तसेच कृषी खात्याच्या संचालकांना निवेदन सादर केले होते.
या निवेदनाद्वारे शहरातील शेतकऱ्यांना तात्काळ युरिया खताचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची पूर्तता करताना कृषी खात्यातर्फे आजपासून युरिया खताचा पुरवठ्याला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण पसरले असले तरी युरियाची बऱ्याच प्रमाणात गरज आहे.
कृषी खात्याने युरिया खत उपलब्ध करून दिले असले तरी अजून जादा युरियाची गरज असल्यामुळे शहर शेतकरी संघटनेने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दरम्यान, सध्या ज्या शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी संबंधित दुकानदारांकडे ही उपलब्ध आहे.
रयत गल्ली, वडगांव येथे आज रविवारी शेतकऱ्यांना युरिया खताचे वितरण करण्यात आले.