belgaum

आज सायंकाळी 6 वाजल्यापासून दारू विक्रीवर बंदी!

0
31
Arrack shop
Person drinking arrack wine shop
 belgaum

आयोध्या येथील श्री राम मंदिराचा भूमिपूजन समारंभ उद्या बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी होणार आहे त्यामुळे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यात आज मंगळवार दि. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून गुरुवार दि 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मद्य अर्थात दारू विक्रीवर बंदी असणार आहे.

बेळगावचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांनी तसा आदेश जारी केला आहे.सदर कालावधीत मद्य विक्री दुकाने, वाईन शॉप, रेस्टॉरंट, क्लब आणि डेपोमधील दारू विक्रीवर बंदी असणार आहे.

श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाव्दारे देशात एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. तेव्हा या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी पूर्व खबरदारी म्हणून दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान राज्यासह बेळगाव जिल्ह्यात देखील बुधवारी कडेकोट बंदोबस्त असणार आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस दल कार्यकर्त असणार आहे . बेळगाव शहरात देखील पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.