कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव प्रशासनातर्फे ठरविण्यात आलेल्या मार्गसूचीनुसार साजरा होत आहे. हा रोग सांसर्गिक असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जनासाठीही सुविधा पुरविण्यात येणार आहे. आगमनासोबतच विसर्जनाच्या दिवशीही काही नियम आणि अटी ठरवून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने विविध विभागातील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी खालील ठिकाणी ठराविक वेळेनुसार व्यवस्था करण्यात आली आहे.
साईबाबा देवस्थान जवळ, वंटमुरी – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
शाहू नगर, शेवटचा बसस्टॉप – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
हरी मंदिर अनगोळ – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
कणबर्गी देवस्थानाकडे जाणारा रास्ता – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
देवराज अर्स कॉलनी – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
हिंडलगा, कोळची विकास मंडळाच्या जवळ – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
सह्याद्री नगर, पाण्याची टाकी जवळ – दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत
बेळगाव किल्ला क्षेत्र – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
कॅम्प पोलीस ठाण्याजवळ – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
लक्ष्मी टेक, लक्ष्मी देवस्थान जवळ – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
जुन्या पोलीस स्थानकाजवळ – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
रामतीर्थ नगर ले-आउट, शिवालयाजवळ – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
कुमारस्वामी लेआऊट – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
ऑटो नगर – सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
विश्वेश्वरय्या नगर, बस स्टॉप जवळ – दुपारी ३ ते सायंकाळी ४ पर्यंत
रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक – सायंकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत
स्टेट बँक ऑफ मैसूर – सायंकाळी ६ ते ७ पर्यंत
डॉ. स. ज. नागलोतीमठ घराजवळील, बॉक्साइट रोड – सायंकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत
हनुमान नगर सर्कल – रात्रौ ९ ते १० पर्यंत
भाग्य नगर, ५ वा क्रॉस – दुपारी ३ ते सायंकाळी ४ पर्यंत
पहिले रेल्वे गेट गणेश चौक टिळकवाडी – सायंकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत
जुना पी. बी. रोड, धाकोजी हॉस्पिटल जवळ, खासबाग – सायंकाळी ६.०० ते ७.०० पर्यंत
बसवेश्वर चौक, खासबाग – सायंकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत
सुभाष मार्केट, हिंदवाडी – रात्री ९ ते १० पर्यंत