सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गणेश चतुर्थी निमित्त घरातच शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून गणपतीची मूर्ती तयार केली आहे.दहा दिवस त्याने परिश्रम घेऊन ही मूर्ती तयार केली आहे.शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिस मिसळून त्याने मूर्ती साकारली आहे.
मूर्ती पूर्ण झाल्यावर त्याने ऑइल पेंटचा वापर करून मूर्तीची रंगरंगोटी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हा विद्यार्थी गणेशोत्सव कालावधीत गणपतीची मूर्ती तयार करून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत आहे.महीप श्रीकांत अध्यापक असे या बाल मूर्तीकाराचे नाव आहे.
तो सेंट झेव्हियर्स शाळेत सहावीत शिकत आहे.त्याला बालपणापासून चित्रे काढण्याचा आणि मातीचा,शाडूचा वापर करून निरनिराळ्या वस्तू तयार करायचा छंद आहे.
शिवाजी महाराजांच्या देखील अनेक मूर्ती महीप याने तयार केल्या आहेत.क्रिकेटपटू,गणपती ,वेगवेगळ्या कार यांची हुबेहूब चित्रे महीप याने काढली आहेत.