कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने एसएसएलसी पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. हि परीक्षा २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार असून कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे एकूण १८,०६७ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी मिळाली नव्हती. परंतु पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी मिळाली आहे.
या परीक्षेचा अवधी तीन तसंच असून सकाळच्या सत्रात या परीक्षा होणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.४५ पर्यंत हि परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यासाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येणार आहे.
यावर्षी एसएसएलसी परीक्षेत एकूण ५,८२,३१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण ७१.८० टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गन मिळविणे आवश्यक आहे.
ज्युनियर टेक्निकल स्कुलच्या विद्यार्थ्यांसाठी २९ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असून या दरम्यान पीयूसी द्वितीय वर्षाचीही पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबर पासून या परीक्षा सुरु होणार असून उर्दू आणि संस्कृतच्या पेपरने या परीक्षांची सुरुवात होणार आहे. तसेच १८ सप्टेंबर रोजी भूगोल विषयाच्या पेपरने परीक्षेचा समारोप होईल.
एसएसएलसी पुरवणी परीक्षा वेळापत्रक – २०२०
२१ सप्टेंबर गणित, समाजशास्त्र
२२ सप्टेंबर – प्रथम भाषा, कन्नड, मराठी, तेलगू, हिंदी, तामिळ, उर्दू, इंग्रजी, संस्कृत
२३ सप्टेंबर – सामाजिक विज्ञान
२४ सप्टेंबर – इंग्रजी, कन्नड
२५ सप्टेंबर – हिंदी, कन्नड, इंग्रजी, अरबी, पर्शियन, उर्दू, संस्कृत, कोकणी, तुळू
२६ सप्टेंबर – यांत्रिकी व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, अभियांत्रिकी ग्राफिक्स – २, इलेक्ट्रॉनिकस अभियांत्रिकी घटक, संगणक विंज्ञानाचे घटक, भारतीय अर्थशास्त्र
२८ सप्टेंबर – विज्ञान, राज्यशास्त्र, कर्नाटक संगीत, हिंदुस्थानी संगीत