गेल्या काही दिवसा पासून वाट पहात असलेल्या राज्यातील साडे आठ लाख दहावीच्या विद्यार्थ्यांची आतुरता संपली असून अखेर सोमवारी १० आगष्ट रोजी एसएसएलसी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाही केला जाणार आहे.
कर्नाटक राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी फेस बुक पोस्ट द्वारा दहावीचा निकाल सोमवारी दुपारी ३ वाजल्या नंतर जाहीर होईल अशी घोषणा केली आहे.
दहावीचा निकाल दुपारी ३ वाजल्या नंतर केएसईईबीच्या अधिकृत वेब साईटवर karresults.nic.in जाहीर केला जाणार आहे राज्यात ८ लक्ष ४० हजार विध्यार्थानी दहावीची परीक्षा दिली असून आता पालकात आणि विध्यार्थ्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे .
कालचा शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दहावीचा निकाल लवकरच जाईचर करू असे वक्तव्य केले होते त्या नंतर शुक्रवारी मंत्री सुरेश कुमार यांनी माहिती देत सोमवारी निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या वेब साईटवर देखील दहावीचा निकाल उपलब्ध असेल ..
kseeb.kar.nic.in,karresults.nic.in,examresults.net,indiaresults.com