सर्वांचे लक्ष लागून राहिलेला दहावीचा निकाल एकदाचा जाहीर झाला. राज्यात दहावी निकालात बेळगाव जिल्ह्याची 31 व्य स्थानी घसरण झाली आहे. तर चिकोडी शैक्षणिक जिल्हा 30 व्या स्थानी घसरला आहे. बेळगाव जिल्ह्याचा निकाल ७१.८० टक्के इतका लागला आहे. शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर हा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, कोविड संसर्गाची भीती असूनही 8,11,050 विद्यार्थी यावेळी परीक्षेसाठी दाखल झाले होते. यापैकी एकूण 5,82,316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात दहावीच्या निकालात बेळगाव जिल्हा ३० व्या स्थानी चिकोडी तर ३१ व्या स्थानी फेकला गेला आहे बेळगाव जिल्ह्याची ३१ व्या स्थानी घसरण झाली आहे. मागील वर्षी २०१८-१९ साली बेळगाव जिल्हा ७७.४३ टक्के निकाल घेत २४ व्या स्थानी होता यावर्षी सात स्थानावर बेळगाव जिल्ह्याची घसरण झाली आहे.
गेल्या वर्षी ८४. ०९ टक्के गुण मिळवत चिकोडी जिल्हा १३ व्या स्थानी होता यावर्षी या शैक्षणिक जिल्ह्याची घसरण ३० व्या स्थानी झाली आहे १७ क्रमांकाने याची घसरण झाली आहे.
बेळगाव कन्नड माध्यमातील विद्यार्थी राज्यात चमकले
दहावी परीक्षा निकालात चमकले कन्नड माध्यमातील विद्यार्थी दहावीचा निकाल आज जाहीर झाला. आणि या निकालात बेळगावची ३० व्य…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 10, 2020