शहर परिसर आणि तालुक्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक नद्या प्रवाहित झाल्या आहेत. गेल्या ३ दिवसात पडलेल्या पावसामुळे बेळगावमधील मलप्रभा नदी ओसंडून वाहत आहे. यामुळे रामदुर्ग तालुक्यातील अनेक गवे पुरमय झाली आहेत.
एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे पावसामुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि त्यातच भर म्हणून आता या प्रवाहित ठिकाणी सापांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात अनेक साप आढळून येत असून येथील नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत.
रामदुर्ग परिसरातील नागरिकांनी याचा धसका घेतला असून खबरदारी म्हणून आळीपाळीने रात्रंदिवस प्रत्येकी दोघेजण या भागात पहारा देत आहेत.