मंत्री ईश्वराप्पा बेळगावात आल्या नंतर पिरनवाडी येथे क्रांतिवीर संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्या बाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गुरुवारी दुपारी घेतली होती मात्र मध्यरात्री रायन्ना समर्थकांनी रात्रीच्या अंधारात पुन्हा पिरनवाडी येथे रायन्ना यांचा पुतळा बसवला आहे.
स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करलेल्या वीर संगोळळी रायन्ना यांचा पुतळा अश्या पद्धतीनं अंधाऱ्या रात्री बसवून संबंधितानी काय साध्य केलं हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
हलगा येथील सुवर्ण सौधच्या अंगणात रायन्ना यांचे स्मारक करण्याचे घाटत असताना पिरनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा उभा करण्याचा हा अट्टहास केला जात आहे यामागे कोण आहेत अद्याप गुलदस्त्यात आहे. रायन्ना समर्थकांनी हा पुतळा रात्रीच्यावेळी दुसऱ्यांदा बसवला आहे
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रायन्ना यांचा पुतळा उभारण्यात आलाय बेळगावातील मराठा लाईट इंफंट्रीसारखी सेना सुद्धा जय भवानी जय शिवाजी घोषणेने गरजूंन उठते या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गळ्यात रुचते बेळगावातील सत्ताधारी पक्षातील आणि आणि अनेक संघटनांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे लाखांचा पोशिंदा टिकला पाहिजे अशी मागणी यानिमित्ताने वाढली आहे.
शुक्रवारी पहाटे रात्रीच्या अंधारात पिरनवाडीत रायन्ना यांचा पुतळा बसवल्या नंतर तणावाचे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मध्यरात्रीचं रायन्ना समर्थकांनी काँक्रेट घालून हा पुतळा बसवला आहे शेकडो रायन्ना समर्थक या ठिकाणी एकत्रित जमले आहेत.
पिरनवाडी येथील सदर पुतळ्या बाबत पर्यायी जागा देऊन भव्य स्मारक उभे करण्याबाबत देखील पालक मंत्र्यांची रायन्ना समर्थकांशी चर्चा होती संगोळळी रायन्ना हे कट्टर देशभक्त होते अश्या स्वातंत्र्य विराचा पुतळा दिवसा ढवळ्या आदराने सन्मान पूर्वक बसवण्या ऐवजी रात्रीच्या बसवण्यात आला याबाबत देखील उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे मात्र याकडे जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.