आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरी तहसीलदार व गावातील पंचाची बैठक झाली या बैठकीत आगामी आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला.
मणगुत्ती गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या वरून वातावरण तापले आहे.गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे.तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ,पंच मंडळी यांची बैठक सुरु झाली.
5 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता.गावातील एका गटाचा त्याला विरोध होता.ग्राम पंचायतींने परवानगी दिली होती.पण पुतळा हलविण्यात आला.त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत.
गावातील महिला,तरुण संख्येने गावातील चौकात जमले आहेत.पोलीस बैठक घेत आहेत.पुतळा त्वरित बस वावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पुतळा बसावे पर्यंत मागे हटणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.
बेळगावातून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा कार्यकर्ते गौरांग गेंजी, सांगलीतील बेळगाव मधील शिव प्रेमी युवक यावेळी उपस्थित होते.आठ दिवसात एकमेकांच्या सहमतीने आठ दिवसात तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=298028041304184&id=375504746140458