गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नंदिहळ्ळी येथील गुरुव्हाळ ब्रिजनजीकचा रस्ता एका बाजूला मोठ्या प्रमाणात खचला असल्यामुळे रहदारीची समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नंदीहळ्ळी ते गर्लगुंजी गावादरम्यानचा रस्ता गुरुव्हाळ ब्रिजनजीक अर्ध्याहून अधिक खचला आहे. यापद्धतीने 50 पेक्षा जास्त मीटर अंतराचा रस्ता खचल्यामुळे गावकऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे.
मोठ्या प्रमाणात खचलेला हा रस्ता विशेष करून वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. तरी लोकप्रतिनिधी ग्रामीण आमदारांसह जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खचलेला हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करून रहदारीसाठी सोयीचा करावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.