इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या बेळगावातील विद्यार्थ्याने राम मंदिर भूमी पूजनाचे औचित्य साधून राम मंदिरासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे चित्र राम या अक्षरामध्ये काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
अजिंक्य अजित औरवाडकर असे या चित्र काढलेल्या तरुणाचे नाव आहे.त्याचे वडील अजित हे देखील प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट आहेत.
अजिंक्य अजित औरवाडकर अयोध्येत श्री राम मंदिर भूमि पूजन करण्यात आले त्या साठी दिलेले अनेक योगदान पैकी काही मोजके महत्वाचे असलेले नेते यांचे राम या अक्षरा मध्ये भावचित्र पेन्सिल ने रेखाटून अभिवादन केले आहे.
दोन फूट बाय अडीच फूट आकाराचे हे चित्र असून हे चित्र काढण्यासाठी अजित याला पाच तास लागले.
या चित्रात बाळासाहेब ठाकरे,मुरली मनोहर जोशी,अटल बिहारी वाजपेयी,अशोक सिंघल,उमा भारती,लालकृष्ण अडवाणी ,कल्याण सिंग,साध्वी प्रज्ञा,कोठारी बंधू,नरेंद्र मोदी आणि साध्वी रुतंभरा यांची चित्रे आहेत.