बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात 1ऑगस्टपासून आतापर्यंत 310.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील अथणी, मुडलगी आणि रामदुर्ग वगळता बेळगांवसह अन्य सर्व तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्रांमधील ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतच्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे.
अथणी एचबीसी -53 मि. मी., बैलहोंगल आयबी -83 मि. मी., बेळगाव आयबी -273 मि. मी., चिकोडी -97 मि. मी., गोकाक -52 मि. मी., हुक्केरी एसएफ -89 मि. मी., कागवाड (शेडबाळ) -66.1 मि. मी.,
खानापूर -412 मि. मी., कित्तूर -185 मि. मी., मुडलगी -57.3 मि. मी., निपाणी आयबी -154.3 मि. मी., रायबाग -54 मि. मी., रामदुर्ग -64 मि. मी. आणि सौंदत्ती -60 मि. मी.