गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जलाशयांत मधील पाणी धोक्याची पातळी ओलांडली की काय असे वाटत असतानाच हिरण्यकेशी नदी, मार्कंडेय नदी आणि बळ्ळारी नाल्याचे पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टळला असून प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
पावसाने उसंत घेतल्यामुळे आज शनिवारी हिडकल जलाशयामध्ये 46,749 क्युसेस इतका पाण्याचा इनफ्लो होता तर आउट फ्लो 130 क्युसेस इतका होता. हिडकल जलाशयाची पाणीसाठा क्षमता 51 टीएमसी असून सध्या या जलाशयात 41.98 टीएमसी पाणीसाठा आहे. घटाप्रभा नदीतून सध्या 41 हजार 59 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. यामध्ये हिरण्यकेशी नदीतील 23,625 क्युसेस मार्कंडेय नदीतील 8,534 क्युसेस आणि बळ्ळारी नाल्यातील 8,900 क्युसेस पाण्याचा समावेश आहे.
सध्या राजापूर बॅरेज मधून कृष्णा नदीमध्ये 1,28,875 क्युसेस आणि दुधगंगा नदीमध्ये 36,264 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. त्याचप्रमाणे कल्लोळि बॅरेजमधून 1,62,139 क्युसेस इतक्या पाण्याचा विसर्ग कृष्णानदी होत आहे.
नारायणपूर धरणांमधील पाण्याची पातळी काल मध्यरात्री 1 वाजता 490.75 मीटर्स इतकी होती. या धरणांमध्ये 1,80,000 क्युसेस पाणी येत होते तर पाण्याचा विसर्ग 1,79,060 क्युसेस इतका होता.
सध्या या धरणाची पाणी साठ्याची क्षमता 26.1 84 टीएमसी फूट इतकी आहे नारायणपूर प्रमाणे आज शनिवारी सकाळी 6 वाजता अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517.81 मीटर इतकी होती. तसेच या धरणातील पाण्याचा इनफ्लो आणि आऊट फ्लो 1,80,000 क्युसेस इतका होता. सध्या या धरण्यात 95.058 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.