Wednesday, January 8, 2025

/

 खाजगी शाळांकडून पालकांना भुर्दंड!

 belgaum

आधीच आर्थिक अडचणींना सामोरे जात असलेल्या पालकांना आता काही खाजगी शाळांमधून नवीन भुर्दंडाला सामोरे जाण्याची वेळ आहे. स्मार्ट फोन वर सुरु असलेल्या अभ्यासक्रमासहित आता पालकांना पाठयपुस्तकांचा अधिक खर्चही झेलावा लागत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उलथापालथ झाली असून अनेकजण आर्थिक मंदीला सामोरे गेले आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार कोलमडून गेले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून मार्च महिन्यापासून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बंद करण्यात आलेल्या शाळा ऑनलाईन पद्धतीद्वारे सुरु करण्यात आल्या. विद्यार्थ्यांची दररोज ऑनलाईन शिक्षणपद्धतीद्वारे शिकवणी सुरु झाली.

या ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणासाठी अनेक पालकांना “स्मार्ट” होण्याची गरज लागली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यासक्रम दिला जाऊ लागला. यामध्ये अनेक पालकांना “स्मार्ट फोनचा” भुर्दंड बसला. आणि अशातच एका खाजगी शाळेमधून १२५०/- रुपये शुल्क आकारून वह्या-पुस्तके देण्यात आली आहेत.

आधीच कोरोनामुळे त्रस्त होऊन अनेक लोकांना आपला व्यवसाय, नोकरी गमवावी लागली आहे. अनेक पालकांना हा अधिक खर्च झेपणारा नाही. ऑनलाईन शिक्षण सुरु असूनही अशाप्रकारे शाळांकडून होणारी जबरदस्ती आणि नाहक भुर्दंड यामुळे पालक अधिकच वैतागले आहेत. पालकांचा संताप अनावर होण्याआधी शिक्षण खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.