Monday, December 23, 2024

/

पोलिसांनी उचलला आरोग्य तपासणीचा विडा कोरोना

 belgaum

महामारीमुळे अनेक जण भयभीत झाले आहेत याची लागण डॉक्टर नाही लागली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सध्या आरोग्य विभागाचे काम पोलिसांवर सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. बेळगाव येथील सरकारी कार्यालयांमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना ऐवजी पोलीसच थर्मल स्क्रीनिग करत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.

बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये घेण्यात येणाऱ्या सभा समारंभात सहभागी होण्याआधी शरीराचे तापमान म्हणजेच थर्मल स्क्रीनिंग टेस्ट, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. सर्किट हाऊसमध्ये प्रवेशद्वारावर महिला पोलीसच, तिथे येणाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करुन सॅनिटायझर देत आहे. इतके दिवस आरोग्य कर्मचारी करीत असलेले हे काम आता महिला पोलिसांवर सोपवण्यात आले आहे.

मार्केट पोलीस स्थानकातील ही महिला पोलीस आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचे काम करीत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मंगळवार बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. सर्किट हाऊसच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या मार्केट पोलीस स्टेशन महिला एक महिला पोलीस, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच लोकांची थर्मल तपासणी करीत होती. महिला पोलिसांना थर्मल स्क्रीनिंग मशीन, तसेच सॅनिटायझरची बाटली देण्यात आली होती.Police

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महिला पोलिसांना हे काम सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हा चर्चेचा विषय बनला आहे.

बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये घेण्यात येणाऱ्या सभा समारंभात सहभागी होणाऱ्यांचे शरीराचे तापमान तपासून त्यांना सॅनिटायझर देण्याचे काम महिला पोलीस करीत आहे. हातात लाठी देऊन कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या महिला पोलिसाला आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.