बेळगाव हे सांस्कृतिक आणि धार्मिक लोकांचा वावर असणार शहर म्हणून ओळखले जाते येथील विविध जाती धर्माचे लोक धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या अधिक आहे यासाठी बेळगाव हुन थेट राम जन्मभूमी अयोध्या नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
दीड दिवसांचा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या बेळगाव येथील हुतात्मा चौकातील सार्वजनिक गणेश मंडळांला भेट दिल्यावर मंडळाने केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
बेळगावातुन काशी,रामेश्वर,मथुरा,वैष्णोदेवी सह इतर धार्मिक स्थळांना भेटी देणारे लोक भरपूर आहेत यांना फायदा व्हावा म्हणून धार्मिक स्थळांना भेट देणारी रेल्वे गाडी सुरू करण्याचा विचार करत आहोत खास करून बेळगाव ते अयोध्या थेट रेल्वे सुरू करणार असे त्यांनी नमूद केलं.
रामदेव गल्लीतील राम मंदिरात आले असता शिवाजी हंडे यांनी अंगडी यांना 1997 साली हुतात्मा चौक मंडळाची सत्य नारायण पूजा आपण बसला होता या मंडळांला यावर्षी 74 वर्षे पूढील वर्षी 75 व्या वर्षी तुमच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम राबवूया अशी विनंती केली असता त्यांनी मंडळाला भेट दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर,माजी महापौर शिवाजी सुंठकर, अशोक कलबुर्गी रामकुमार जोशी शाम सुतार राजकुमार कलघटगी शेखर हंडे गोपाळ पुरोहित बापू सुर्यवंशी चंदू कोलकर तानाजी भेकने रिक्षा चालक व व्यापारी हजर होते