कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेश उत्सवावर शासनाने निर्बंध आणले आहेत त्याला गणेश मंडळाच्या कडूनही प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाला टक्कर देण्यासाठी यावर्षी गणेश उत्सव शासकीय नियमानुसार साजरा होत आहे अश्या वेळी अनेक सार्वजनिक गणेश मंडळ स्वता होऊन उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेत आहेत.
महर्षी महात्मा गांधी रोड टिळकवाडी यागणेश मंडळाने अकरा ऐवजी पाचचं दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहेत.कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कमी दिवसांचा कालावधी त्यांनी निवडला आहे.
महर्षी रोड वर सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी गणपतीची प्रतिष्ठापणा केली आहे.मंदिरात सोशल डिस्टन्स पाळला जात असून पहिल्या दिवशी केवळ भटजी आणि मंडळाचे अध्यक्ष प्रसाद तवनोजी यांनी आरती केली.