Sunday, January 12, 2025

/

पदवी अभ्यासक्रमाला १ सप्टेंबरपासून ऑनलाईन तर ऑक्टोबरमध्ये होणार ऑफलाईन सुरुवात

 belgaum

यंदा कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात बदल झाला असून शैक्षणिक वर्ष आणि त्यासोबतच परीक्षांचाही खोळंबा झाला. शैक्षणिक वर्षाला कधी सुरवात होणार आणि पदवी अभ्यासक्रमाला ऑनलाईन अभ्यासक्रमाला परवानगी मिळणार का? अशा अनेक प्रश्नांवर आज ठोस उत्तर मिळाले आहे.

विविध पदवी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल तर ऑक्टोबरमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू होतील. अशी माहिती उच्चशिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी दिली आहे. सुब्रह्मण्य नगर येथील विकासकामांना प्रारंभ करण्यास उपस्थित असलेल्या अश्वथ नारायण यांनी हि माहिती आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले कि, सरकार ऑफलाईन पदवी परीक्षा तसेच ऑफलाईन वर्ग सुरु करण्याबाबत केंद्राच्या मार्गसूचीच्या प्रतीक्षेत आहे. ऑकटोबरमध्ये सर्व महाविद्यालये रीतसर सुरु कारणात येणार असून त्यावेळी विद्यार्थी हजर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यसरकारच्या वतीने यापूर्वीच युजीसीने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून ऑफलाइन वर्ग सुरू करण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबरोबरच अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा पदवीधर, पदविका आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी असतील. अनुशेष (बॅकलॉग) असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी सांगितले आहे.

NEET परीक्षांबाबतीत बोलताना ते म्हणाले कि, राज्य सरकारने १.९४ अधिक आणि 63 कोविड-पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसह सीईटी यशस्वीरित्या आयोजित केले आहे. परंतु “लोक एनईईटी आयोजित करण्यास का विरोध करीत आहेत हे मला समजत नाही. मला याबद्दल शंका आहे की याबद्दल काहीतरी गोंधळ उडालेला आहे. काही विशिष्ट गटांना गुणवत्तेच्या आधारे अपारदर्शक ‘सिस्टम’ द्वारे जागा वाटप करायच्या आहेत. काही स्वार्थी लोक सुरुवातीपासूनच एनईईटीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ” परंतु या परीक्षा होतीलच असे अश्वथ नारायण यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.