कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डिस्चार्ज प्रक्रियेच्या आपल्या धोरणाची सुधारित मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या असिम्प्टोमेटीक अर्थात रोगाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना 10 दिवसानंतर पुन्हा चांचणी न करता डिस्चार्ज दिला जाणार आहे.
डिस्चार्ज संदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचीनुसार एखाद्या रुग्णाचा स्वॅब 1 ऑगस्ट रोजी घेण्यात आला आणि तो पॉझिटिव्ह आला असला तरी दहा दिवसानंतर म्हणजे 11 ऑगस्ट रोजी संबंधित रुग्णाला डिस्चार्ज दिला जाईल. यासाठी त्याची डिस्चार्ज पूर्वी आरटी -पीसीआर, सीबीएनए एटी, ट्रू एनएटी चांचणी घेतली जाणार नाही. तथापि महत्त्वाची गोष्ट ही की हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्या रुग्णांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे दिसतात कामा नयेत. डिस्चार्जच्या वेळी संबंधित रुग्णाला 14 दिवस होऊन काॅरंटाईन राहण्याचा सल्ला दिला जाईल.
अंगात ताप नसणे आणि शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशन अर्थात प्राणवायू संपृक्तता 90 टक्क्यावर असली पाहिजे हे संबंधित रुग्णात रोगाची लक्षणे नसण्याचे निकष आहेत. दरम्यान गेल्या 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान दररोज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – 1/51, 2/56, 3/29, 4/28, 5/52, 6/44, 7/52, 8/378, 9/455.