कोरोना महामारी मुळे सर्वत्रच भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक जण घराबाहेर पडताना विचार करताना दिसताहेत. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
आता कडोली येथेही पहिला रुग्ण आढळला असून नागरिकांना धास्ती लागून राहिले आहे. कडोली येथील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. तिचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यामुळे गावात आता मोठी भीती निर्माण झाली आहे.
कडोली गावात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करून आरोग्यच्या समस्यां आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्या व्यक्तींच्या घरात रुग्ण आढळला आहे ते घर सीलडाऊन करण्यात आले आहे. आतापर्यंत कडोली गावात शिरकाव झाला नव्हता. मात्र आता एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावात खळबळ माजली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर काही जणांचे स्वब घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. हे रुग्ण वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहेत. आता लवकरच कडोली गावात खबरदारी घेण्यात येत आहे. तर काही भाग सिलडाऊन ठेवून करण्यात आला आहे. सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिक नियमांचे पालन करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र पहिल्यांदाच कडोली येथे कोरोना रुग्ण आढळल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
M proud of ur efforts in giving the Bgm news as quick as possible…but one advise to u…plcheck ur english language…its poor..u need to improve on that…m ready to help u in this matter if required…so that u can b perfect…two days before u gave Mr.D.T.Desai’s death news….there wereso many grammatical mistakes..pl look into it…
9590229030 call kra saheb sangato