बेळगाव तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजला जाणारा हलगा मोहरम सण देखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधे पणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी हलगा ग्रामस्थांच्या वतीनं मोहरम मोठया उत्साहाने साजरा केला जातो पण या वर्षी कोरोना या महामारीच्या संकटामुळे हा सण साधेपणाने करण्याचे ठरविण्यात आले आहे. गावातील अनेक भक्तगण व ग्राम पंचायत टास्क फोर्स कमिटी,गावातील देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धाकलु बिळगोजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत ग्राम पंचायत सरकारी प्रशासक एस पी अलकुंडी,ग्रा,प, पी, डी, ओ कल्याणी चौगुला सेक्रेटरी, जोसेफ फर्नांडिस , सदस्य प्रकाश लोहार ,चंद्रकांत कानोजी कल्लाप्पा संताजी व मशिदीचे पुजारी जंगुसाब मुल्ला ,मौलालीसाब उपस्थित होते.
मोहरम निमित्त दर्ग्याकडे कुणीही जाऊ नये,पाहुण्यांना आमंत्रण देऊ नये,ताबूत गावात फिरणार नाहीत.दर्ग्याशी संबंधित मोजक्याच लोकांनी आणि ताबूत धारकांनी मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्सचा अवलंब करत विधी पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी फकिरा संताजी, खेमानी हणमंताचे ,संजय बिळगोजी,रमेश बिळगोजी,बाळू कामती,अर्जुन कानोजी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हलगा ग्रामस्थांनी नियमाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन ग्राम पंचायतच्या वतीनं सदस्य प्रकाश लोहार यांनी केले आहे.