बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची बैठक कोरोनामुळे अनेक महिन्यापासून घेण्यात आली नव्हती ही बैठक मंगळवारी मराठा सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्षव बसवेश्वर बँकेचे संचालक श्री बाळाना बी कग्गणगी हे होते. बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सल्लागार आणि दैवज्ञ बँकेचे संचालक श्री मंजुनाथ शेठ यांनी करून असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला.
या असोसिएशनची 1959 च्या कायद्यानुसार नोंदणी करण्याबाबत, बँकेच्या कार्यकारी मंडळांच्या जबाबदाऱ्याबाबत चर्चा करण्यात आली. थकबाकी वसुली संदर्भात रिझर्व बँकेकडून आलेल्या गाईडलाईन्सची माहितीही यावेळी देण्यात आली.
बँक कर्मचार्यांसाठी विमा संरक्षण देण्याबाबत झालेल्या चर्चेत चार्टर्ड अकाउंटंट व सल्लागार राज बोळमल, अनंत लाड,बेल्लद बागेवाडी बँकेचे शहापुरकर व इतर अनेक उपस्थितांनी भाग घेतला. बाळाना कग्गणगी यांनी बऱ्याच महत्वाच्या गोष्टीची चर्चा केली .संघटनेचे उपाध्यक्ष आणि मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर यांनी आभार प्रदर्शन केले
याप्रसंगी पायोनियर बँकेचे नूतन संचालक अनंत लाड आणि मराठा बँकेचे जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर यांचा अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे खजिनदार अमरनाथ महाजनशेट्टी, शांताप्पाना मिरजी बँकेचे बी ए भोजकर यांच्यासह अनेक बँकांचे संचालक उपस्थित होते