साऊंड सिस्टम आणि लायटिंग व्यवसाय करणाऱ्याना राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा करावी व गणेश उत्सव काळात या व्यावसायिकाना काम करायला अनुमती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना लायटिंग व्यावसायिक धारकांनी निवेदन सादर केले.
कोरोना महामारी मुळे सध्या छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीयंत्रणा आणि लाईट सिस्टीम व्यावसायिक उद्योजकांना सरकारकडून अर्थसहाय्य मिळावे. त्याचप्रमाणे त्यांना गणेशोत्सवात व्यवसायाची अनुमती देण्यात यावी अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.
गणेशोत्सवात राज्य सरकारने काही अटी घातल्यामुळे साऊंड सिस्टम आणि लाईट सिस्टीम संचालकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या छोट्या व्यावसायिकांना सध्या उपजीविकेसाठी कोणताही उद्योग राहिला नसून त्यामुळे हे व्यवसाय संकटात सापडले आहेत.
याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच सरकारने या व्यावसायिकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे .संघटनेचे अध्यक्ष श्याम गौंडाडकर ,साई कणेरी, प्रवीण प्रभू आदींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.