Wednesday, January 29, 2025

/

जयंत पाटील यांनी केली कोयना धरणाची पहाणी

 belgaum

जयंत पाटील यांनी केली कोयना धरणाची पहाणी

महाराष्ट्राच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयाची पहाणी केली 105 टी एम सी पाणी क्षमता असलेलं धरण भरण्यासाठी अद्याप 12 टी एम सी बाकी आहे.

राधानगरीतून 4256; अलमट्टीतून 250000 क्युसेक विसर्ग*

 belgaum

कोल्हापूर राधानगरी धरणात 233.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणाचे 4 व 5 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून 4256, कोयनेतून 55958 तर अलमट्टी धरणातून 250000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.*
जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

Jayant patil
Jayant patil

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- तारळे, शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पणोरे, गवशी, मासुर्ली, कासारी नदीवरील- यवलूज, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ-तिरपण, ठाणे आवळे, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कळे, शेणवडे व मांडूकली, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, शिगांव, मांगले सावर्डे, खोची व दानोळी, कडवी नदीवरील- सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगांव, सवर्तेसावर्डे, सरूडपाटणे, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सुळंबी, तुरंबे व वाळवे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील-साळगांव, निलजी, गिजवणे, ऐनापूर, खणदाळ, हरळी, जरळी, दाभीळ, देवर्डे, चांदेवाडी, गजरगाव व भादवण, घटप्रभा नदीवरील-कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूरभोगोली, हिंडगाव, तारेवाडी व कानडेवाडी, ताम्रपणी नदीवरील- चंदगड, कूरतनवाडी, कोवाड, हल्लारवाडी व माणगाव असे एकूण 88 बंधारे पाण्याखाली आहेत.

नजिकच्या कोयना धरणात 92.28 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 102.412 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 92.90 दलघमी, वारणा 894.35 दलघमी, दूधगंगा 665.98 दलघमी, कासारी 66.95 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 68.98 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 37.50 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा 44.170 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 39.9 फूट, सुर्वे 37.6 फूट, रुई 67.9 फूट, इचलकरंजी 63 फूट, तेरवाड 58.3 फूट, शिरोळ 57 फूट, नृसिंहवाडी 57 फूट, राजापूर 45.3 फूट तर नजीकच्या सांगली 38.6 फूट व अंकली 41.8 फूट अशी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.